मधमाशी पालन प्रशिक्षण कार्यशाळेचा लाभ घेण्याचे आवाहन

0

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मधकेंद्र योजना संपूर्ण राज्यात कार्यान्वित झालेली असून योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र व्यक्ती, संस्थांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. तसेच येत्या २१ ऑक्टोबर रोजी मधमाशी पालन प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.

मध उद्योगाचे मोफत प्रशिक्षण, साहित्य स्वरूपात ५० टक्के अनुदान, शासनाच्या हमी भावाने मध खरेदी, विशेष (छंद) प्रशिक्षणाची सुविधा, मधमाश्या संरक्षण आणि संवर्धनाची जनजागृती ही या योजनेची वैशिष्ट्ये आहेत. तसेच वैयक्तिक मधपाळ, केंद्र चालक प्रगतीशील मधपाळ हे योजनेतील प्रमुख घटक आहेत.

सावर्डे (ता. चिपळूण) येथील वालवालकर रुग्णालयाच्या परिसरात येत्या २१ ऑक्टोबर रोजी दुपारी २ ते सायंकाळी ५ या वेळेत मधमाशी पालन प्रशिक्षण कार्यशाळा आणि निःशुल्क शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

याबाबत अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, जिल्हा कार्यालय, रत्नागिरी द्वारा जिल्हा उद्योग केंद्र, जेल रोड, रत्नागिरी (दूरध्वनी – 02352-222379), ई-मेल आयडी dvioratna@rediffmail.com येथे संपर्क साधावा, असे आवाहन प्रभारी जिल्हा ग्रामोद्योग अधिकाऱ्यांनी केले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:26 PM 13/Oct/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here