दाभोळ : दाभोळ खाडीच्या बंदरात उभ्या असलेल्या एका बोटीला अचानक आग लागल्याचा प्रकार मंगळवारी रात्री घडला. सुदैवाने खलाशांनी पाण्यात उड्या घेतल्याने जीवित हानी झाली नाही. काही नियमांचे पालन करुन मासेमारीला परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे नौकामालकांनी त्याची तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास दाभोळ खाडीत उभ्या असलेल्या एका बोटीला अचानक आग लागली. ही बोट रत्नागिरी तालुक्यातील तेरेवायंगणी येथील चंद्रकांत शिगवण यांची मालकीची आहे. यात बोटीचे खूप नुकसान झाले आहे.
