लांजा तालुका जिजाऊ ब्रिगेडच्या मौजे रुण पराडकरवाडी या पहिल्या ग्राम शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न

0

लांजा : लांजा तालुका जिजाऊ ब्रिगेडच्या मौजे रुण पराडकरवाडी या पहिल्या ग्राम शाखेचा उदघाटन सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली .

कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी धनिताजी चव्हाण जिजाऊ ब्रिगेड तालुका शाखा अध्यक्षा )यांच्या अध्यक्षतेखाली सभेचे कामकाज करण्यात आले . सभेसाठी स्वप्ना सावंत ( उपाध्यक्षा), स्वप्नाली शेट्ये ( सचिव )सुनिल देसाई ( मराठा सेवा संघ महाराष्ट्र कोकण विभाग संघटक), संभाजी ब्रिगेड जिजाऊ ब्रिगेड संघटक . रत्नागिरी संतोष जाधव -मराठा सेवा संघ महाराष्ट्र कोकण विभाग संघटक जिजाऊ ब्रिगेड तालुका सल्लागार उपस्थित होते.

ग्रामशाखा नं.१ मौजे रुण ( पराडकरवाडी ) शाखेची खालील प्रमाणे नियुक्ती करण्यात आली . शाखाप्रमुख : साक्षी संतोष पराडकर, उपशाखाप्रमुख : प्रणया प्रदीप मोरे, सचिव : रश्मी राकेश सुर्वे, खजिनदार : श्वेता शशिकांत पराडकर, सल्लागार : आदिती अनिल शिंदे तर सदस्या म्हणून सुमित्रा तुकाराम पराडकर, करुणा किशोर कानसरे,सरस्वती गजानन पराडकर,मानसी तुकाराम पराडकर,तन्वी तानाजी पराडकर,प्रियांका पर्शुराम पराडकर, संजना शिवाजी पराडकर, रक्षा राजेश पराडकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली . सर्व कार्यकारिणी सदस्यांचे अध्यक्षा उपाध्यक्षा आणि सचिव यांच्या हस्ते नियुक्ती पत्र आणि पुष्प देऊन टाळ्यांच्या गजरात स्वागत आणि अभिनंदन करून खुप खुप शिवमय शुभेच्छा देण्यात आल्या . संपुर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोहीत सुर्वे, राकेश सुर्वे यानी केले . कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शितल पराडकर ( अंगणवाडी ताई ), तपस्वी जाधव, भरत पराडकर ( वाडीप्रमुख , ) प्रदीप मोरे ( शाळा कमिटी अध्यक्ष ) वैधही वैभव शिंदे ( आशाताई ) विनोद जाधव सर्व ज्येष्ठ नागरीक माता भगिनी महिला मंडळ . रुणयांचे मोलाचे सहकार्य लाभले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here