कोल्हापूरमध्ये दररोज बनत आहेत मशीनद्वारे ५००० चपात्या

0

कोल्हापूर : लॉकडाउनमुळे कोल्हापूर शहरात बरेचसे परप्रांतीय कामगार अडकले आहेत. अडकलेले परप्रांतीय कामगार, फिरस्ते, बंदोबस्तावर असणारे पोलिस यांच्या रोजच्या जेवणाची व्यवस्था कोल्हापुरातील दानशूर व्यक्तींनी हाती घेतली आहे. जेवणात चपाती कमी पडू नये आणि अधिक चपात्या करता याव्यात म्हणून त्यांनी एक मशिन आणले आहे. या मशिनवर दररोज ५००० चपात्या होतात. बंदोबस्तासाठी पोलिस मोठ्या संख्येने रस्त्यावर आहेत. या सर्वाच्या जेवणाची व्यवस्था करण्यासाठी सेंट्रल किचनही बनवण्यात आले आहे. चपात्यांची वाढती गरज लक्षात घेऊन फौंड्री क्लस्टरचे अध्यक्ष सचिन पाटील यांनी चपाती बनवण्याचे मशिन आणले. उमेश निगडे यांच्या वर्कशॉपमध्ये हे मशिन बनवण्यात आले. कणिक मळण्यापासून ते चपाती भाजण्यापर्यंत सर्व काही या मशिनमध्ये होते. त्यामुळे एका तासात ७०० चपात्या केल्या जातात. दिवसात पाच हजार चपात्या करण्याची क्षमता येथे आहे. स्वच्छतेची पूर्ण काळजी येथे घेण्यात आली आहे. आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, पोलिस निरीक्षक उदय डुबल, क्लोन फूड ट्रीट्सचे राजू लिंगस, जयेश कदम, उच्चल नागेशकर, दिलीप देसाई यांच्या सहयोगातून हा उपक्रम सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here