आंबा उत्पादकांना त्यांच्या वाहनातून किमान ४ व्यक्तींना प्रवासाची परवानगी द्यावी : अॅड. पटवर्धन

0

रत्नागिरी : कोरोना पार्श्वभूमीवरील लॉक डाऊनमधील नियमांमध्ये सूट मिळाली असली, तरी आंबा उत्पादकांना त्यांच्या वाहनातून किमान ४ व्यक्तींना प्रवासाची परवानगी देणे अत्यावश्यक आहे, अशी मागणी भाजपचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. सद्यःस्थितीत वाहनातून दोन व्यक्तींना परवानगी आहे. योग्य खबरदारी घेत ४ व्यक्तींना आंबा व्यवसायाकरिता प्रवासासाठी परवानगी मिळणे आवश्यक आहे, असे निवेदनात म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here