संगमेश्वर भाजपा, कोळंबे मंडळाकडून सेवा पंधरवड्यात विविध कार्यक्रम

0

संगमेश्वर : कोळंबे विद्या प्रसारक मंडळाच्या गुरुकुल वसतिगृह सभागृहात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू झालेल्या ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा’ कार्यक्रमाचा समाप्ती समारंभ नुकताच झाला.

भाजपा प्रदेश सचिव प्रमोद जठार यांचे ढोल-ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांनी स्वागत केले. ग्रंथप्रदर्शन व त्यानंतर मोदीजींच्या चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन झाले. संयोजक अनिल घोसाळकर यांनी प्रमोद जठार यांना राममंदिराची प्रतिमा भेट दिली.

सूत्रसंचालन प्रा. सानिका मुळ्ये यांनी केले. इशस्तवन, स्वागतपद्य पार पडले. योगेश मुळे यांनी प्रास्ताविक केले. शालेय विद्यार्थ्यांची भाषणे व कविता वाचन झाले. टी. जे. शिंदे यांनी शिक्षकांचे मनोगत व्यक्त केले. संस्थेचे अध्यक्ष नयन मुळ्ये यांनी मनोगत देशपांडे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दृष्टिकोनातून मोदीजींचे कार्य स्पष्ट केले. प्रमोद जठार यांनी शाळेत नव्याने सुरू झालेल्या वसतिगृहास १ लाख रूपयांची मदत देऊ केली. १० संगणक संच उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. अध्यक्षीय भाषणातून वाचनाचे महत्त्व स्पष्ट केले. मुख्याध्यापक संजय मुळ्ये यांनी आभार मानले. संदीप मुळ्ये यांनी वंदे मातरम म्हणून कार्यक्रमाचा समारोप केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here