रत्नागिरी : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या पुढाकाराने, शिवसेना सचिव खा. विनायक राऊत व ना. उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा शासकीय रुग्णालय येथे अस्मि कँटरर्स तर्फे शिवभोजन थाळी केंद्र ५/- रु मध्ये सुरू करण्यात आले. त्याचे लाभार्थी यांना वाटप करताना नगराध्यक्ष बंड्या साळवी, युवासेना तालुका युवाधिकारी तुषार साळवी, उपशहरप्रमुख प्रशांत साळुंखे, विकास पाटील, आशु तोडणकर, मिलिंद भाटकर, सुमित भाटकर, दिलराज भाटकर, अनिल चव्हाण, आदी उपस्थित होते. त्यावेळी लाभार्थी यांनी ही सुरक्षित अंतर ठेवून रांगेत उपस्थित राहून जेवणाचा आस्वाद घेतला.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
12:13 PM 23-Apr-20

