रत्नागिरी : मनाई आदेश असताना देखील रत्नागिरी पेठ्कील्ला येथील ३५ वर्षीय इसमास त्याच्या घरात घुसून शिवीगाळ करीत मारहाण करणाऱ्या ६ जणांविरुद्ध शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हि घटना कावळेवाडी पेठ्कील्ला येथे घडली. आरोपींनी लाथाबुक्क्याने मारहाण करून शिवीगाळ करून धमकी देऊन फिर्यादी यांचा मोबाईल फोडून नुकसान केले व जीवितास धोकादायक असलेल्या रोगाचा संसर्ग पसरवण्याचा संभव असलेली घातक कृती केली म्हणून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
