प्राथ. शिक्षण विभाग दापोली मार्फत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

0

दापोली : संपूर्ण देशासह राज्यात वाढत चाललेल्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे अनेक लोकांना जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे अनेक गरीब कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. याच पार्श्वभूमीवर दापोलीचे तहसिलदार यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत गटविकास अधि. प्रशांत राऊत, गटशिक्षण अधि. संतोष भोसले आणि सर्व शिक्षक संघटना यांच्या विचाराने तालुक्यातील सर्व शिक्षकांनी प्रत्येकी 500/-रु. प्रमाणे साडेतीन लाख रुपयेचे जीवनावश्यक साहित्य देऊन मदतीचा हात पुढे केला आहे. दापोली तालुक्यातील सुमारे 900 गरीब व गरजू कुटुंबियांना मदत म्हणून शिक्षण विभाग प्राथ. दापोलीकडून किराणा मालाचे वाटप उपसभापती ममता शिंदे, मंडळ अधि. श्री. खानविलकर, गटशिक्षण अधि. संतोष भोसले, तलाठी सानप आदिंच्या हस्ते करण्यात आले. शासनाची मदत मिळण्यापूर्वीच गरजूंना ही मदत मिळत असल्याने या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. जीवनावश्वक वस्तूंचे वाटप करण्यापूर्वी तालुक्यातील अनेक शिक्षकांनी चैतन्य सभागृह येथे चार दिवस साहित्य पॅकिंग करणेसाठीही सहकार्य केले. तालुक्यातील सर्व शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी या उपक्रमासाठी विशेष मेहनत घेतली. यावेळी विस्तार अधि.पद्मन लहांगे, कल्याणी मुळ्ये तसेच जावेद शेख, संदिप जालगावकर, जीवन सुर्वे, विश्वास भोपे, मुकुंद कासारे, प्रवीण काटकर, सुनिल कारखेले, विनायक वाळंज, विठ्ठल कुटेकर, आदि सर्व संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. केलेल्या आवाहनाला तात्काळ प्रतिसाद मिळालेबद्दल तहसिलदार समीर घारे यांनी शिक्षकांप्रती गौरवोद्गार काढले. तर गटशिक्षणाधिकारी संतोष भोसले यांनी तालुक्यातील सर्व शिक्षकांचे आभार मानले.

HTML tutorial

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
4:11 PM 23-Apr-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here