केशरी रेशनकार्ड धारकांना मे चा शिधा उद्यापासून मिळणार

0

रत्नागिरी : राज्यात कोरोना विषाणूमुळे उद्भवणाऱ्या संसर्गजन्य आजारामुळे आपत्कालीन परिस्थिती पाहता राज्यातील कोरोना विषाणूचे प्रसारामुळे नैसर्गिक आपत्ती निर्माण झाल्याने व मुख्यमंत्री यांनी महाराष्ट्रातही लॉकडाऊनचा कालावधी वाढविल्यामुळे शासनाने दिलेल्या सूचनेनुसार प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर एपीएल (केशरी) शिधापत्रिका धारकांना सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील पात्र लाभार्थ्यांसाठी माहे मे ते जून 2020 करता धान्य वाटप करण्याचे आदेश प्राप्त झाले आहेत. यांचे वाटप उद्या 24 एप्रिल रोजी सुरु होणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यासाठी 73597 शिधापत्रिका व त्यावरील 3 लाख 17 हजार 277 सदस्य संख्येला गहू 952 मे. टन तांदूळ 635 मे.टन अन्नधान्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. परंतु रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एकूण 1 लाख 6 हजार 769 शिधापत्रिका व त्यावरील 4 लाख 35 हजार 161 सदस्य संख्या प्राप्त झालेले अन्न हे जिल्ह्याचे मागणीच्या 70 टक्के आहे. त्यामुळे जिल्ह्यामधील लाभधारकांना 70 टक्के प्रमाणे वाटप करण्यात येणार आहे. 1 सदस्य संख्या ला प्रत्यक्ष वाटप 70 टक्के प्रमाणे गहू 3 किलो, तांदूळ 2 किलो . सदस्य संख्या 2 असेल तर 4 किलो गहू आणि तांदूळ 3 किलो तसेच 3 संख्या असेल तर 6 किलो गहू आणि 4 किलो तांदूळ‍ मिळेल. 4 संख्या असेल तर 8 किलो गहू आणि तांदूळ 6 किलो, 5 संख्या असेल तर 11 किलो गहू आणि 7 किलो तांदूळ, सदस्य संख्या 6 असेल तर 13 किलो गहू आणि 8 किलो तांदूळ, सदस्य संख्या 7 असेल तर 15 किलो गहू आणि 10 किलो तांदूळ. सदस्यांची संख्या 8 असेल तर गहू 17 किलो आणि तांदूळ 11 किलो, सदस्यांची संख्या 9 असेल तर 19 किलो गहू आणि 13 किलो तांदूळ तसेच 10 सदस्य संख्या असेल तर 21 किलो गहू आणि 14 किलो तांदूळ याप्रमाणे धान्य वाटप करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील 943 पैकी 493 दुकानांमध्ये धान्य पोहोच झाली असून ते पुढीलप्रमाणे आहे. मंडणगड तालुक्यात एकूण 55 दुकाने असून त्यापैकी 26 दुकानांमध्ये धान्य पोहोचलेले आहे. दापोली तालुक्यात 106 दुकाने असून 56 दुकानांमध्ये धान्य पोहोचले आहे तर खेड तालुक्यात 117 दुकाने असून सर्व दुकानावर धान्य पोहोचले आहे. गुहागर तालुक्यात 72 दुकाने असून 51 दुकानावर धान्य पोहोचले आहे, चिपळूण तालुक्यात 159 दुकानेपैकी 51 दुकानात धान्य पोहोचले आहे. संगमेश्वर – देवरुख तालुक्यात 126 दुकानांपैकी 62 दुकानावर धान्य पोहोचले आहे. रत्नागिरी- पाली – जयगड मधील 141 दुकानांपैकी पैकी 58 दुकानांवर धान्य पोहचलेाहे. लांजा तालुक्यात 71 दुकान पैकी 29 दुकानावर धान्य पोहचले असून राजापूर-पाचल तालुक्यातील 96 दुकानापैकी 53 दुकानांमध्ये धान्य पोहोचले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील 943 दुकानंपैकी 493 दुकानांमध्ये धान्य प्राप्त झालेला आहे. 24 एप्रिल 2020 पासून एपीएल शिधापत्रिकांना माहे मे 2020 चे धान्य देण्यास सुरुवात करण्यात येणार आहे. ज्या गावात शिधापत्रिका असेल त्या गावातच धान्य मिळेल. तरीही लाभार्थ्यांनी दुकानदारांच्या संपर्कात राहून शासनास सहकार्य करावे, असे जिल्हा पुरवठा अधिकारी रत्नागिरी यांनी आवाहन केले आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
5:32 PM 23-Apr-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here