रत्नागिरी : मनोरुग्णालयातून औषधे घ्यायची आहेत असे सांगत वाळवा तालुक्यातून निघालेल्या दोन इसमांना साळवी स्टॉप येथील तपासणी नाक्यावर वाहतूक पोलिसांनी पकडले. यांच्याकडे स्थलांतर करण्याची कोणतीही परवानगी नसताना सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमा ओलांडून चारचाकी गाडीने हे दोन इसम रत्नागिरीत आले. मात्र रत्नागिरी वाहतूक पोलिसांच्या चाणाक्ष नजरेतून यांची सुटका झाली नाही. या दोघांची तपासणी करण्यासाठी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या दोघांना क्वारंटाईन करण्यात येणार आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
6:23 PM 23-Apr-20
