धान खरेदी नोंदणीस मुदतवाढ

0

रत्नागिरी : शासकीय आधारभूत धान खरेदी योजना हंगाम २०२२-२३ मध्ये जिल्ह्यात शासनाच्या वतीने मुख्य अभिकर्ता म्हणून दि. महाराष्ट्र राज्य सहकार पणन महासंघ मुंबई, जिल्हा पणन कार्यालय यांच्यावतीने जिल्ह्यात १४धान खरेदी केंद्रावर धानाची खरेदी करण्यात येते. शासनाने धान खरेदीसाठी १५ ऑक्टोबरपर्यंत नावनोंदणीसाठी मुदत देण्यात आलेली होती. ही मुदत वाढवून २१ ऑक्टोबरपर्यंत करण्यात आली आहे.

सर्व शेतकऱ्यांनी धान पीकाची हंगाम २०२२२३ ची (भाताची) नोंद असलेला सातबारा उतारा, आधार कार्ड, अद्ययावत बँक पासबुक इत्यादी कागदपत्र घेऊन खालील केंद्रावर नोंदणी करावी, असे जिल्हाधिकारी रत्नागिरी एम. देवेंदर सिंह यांनी केले आहे.

तसेच सातबारा/८ अ उताऱ्यासोबत नोंदणी करताना शेतकऱ्यांचा लाईव्ह फोटो संगणक प्रणालीवर अपलोड करायचा आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी २१ ऑक्टोबरपर्यंत खरेदी केंद्रावर त्वरित नोंदणी पूर्ण करावी, असे जिल्हा पणन अधिकारी, रत्नागिरी यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here