वैभव नाईकांच्या मालमत्तेत ३०० पटींनी वाढ; नितेश राणेंनी सादर केली कागदपत्रे

0

सिंधुदुर्ग : उद्धव ठाकरेंच्या भटक्या कुत्र्यांनी कुडाळमध्ये आमच्यावर भुंकण्याचा प्रयत्न केला. उद्धव ठाकरे हे नपुंसक आहेत. स्व. बाळासाहेबांसारखा थेट हल्ला करण्याचे धाडस उद्धव ठाकरे मध्ये नाही. उद्धव ठाकरेंना असे सोंगाडे लागतात अशा खरमरीत शब्दांत आक्रमक झालेल्या भाजपा आमदार नितेश राणे यांनी ठाकरेंवर व आमदार भास्कर जाधव, वैभव नाईक, यांच्यावर कडाडून हल्ला चढवला. कणकवली येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. गेल्या काही वर्षात आमदार वैभव नाईक यांच्या मालमत्तेत ३०० पटींनी कशी वाढ झाली याबाबतची कागद्पत्रच आमदार नितेश राणे यांनी सादर केली.

यावेळी आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करताना आमदार नितेश राणे म्हणाले, आईस्क्रीम कोनचा आणि आदित्य ठाकरेचा काय संबंध हे दिनो मोरयाला विचारा. दोघेही रिझवी कॉलेजच्या मागे बसून हे आईस्क्रीम कोन खायचे. उद्धव ठाकरे यांचे रक्त थंड आहे. म्हणूनच त्याला आईस्क्रीम कोन निशाणी निवडणूक आयोगाने दिली. भास्कर जाधव शिक्षकाचा मुलगा स्वतःला म्हणवतात. पण शिक्षकांचा मुलगा असा करंटा कसा निघाला ? आमदार वैभव नाईकची एसीबी चौकशी का सुरू आहे? एकीकडे चोरीमारी करून वैभव नाईक दोन नंबरची संपत्ती गोळा करायची आणि दुसरीकडे ही भटकी कुत्री येऊन राणेंवर गरळ ओकायची. सोंगाड्याना एकत्र करून नंगा नाच आज कुडाळात केला.

मुद्दा वैभव नाईकांच्या एसीबी चौकशीचा होता. वैभव नाईक यांनी जनतेसमोर जाऊन आपण स्वच्छ प्रतिमेचा असल्याचे जाहीर करणे गरजेचे होते. मात्र राणे आणि भाजपावर तोंडसुख घेण्याचे मोर्चा काढून सुख घेतले. वैभव नाईकची तक्रार करणारा प्रदीप भालेकर हा खासदार विनायक राऊत यांचा माणूस होता. मग भालेकरला वैभव नाईकविरोधात तक्रार द्यायला खासदार राऊत यांनीच भाग पाडले या माझ्या मुद्द्यावर विरोधक का बोलले नाहीत? असा सवाल नितेश राणेंनी केला.

नितेश राणेंनी पत्रकार परिषदेत वैभव नाईक यांचे निवडणूक वेळी सादर केलेले प्रतिज्ञापत्र सादर करत नाईक यांची २००९ साली प्रॉपर्टी ५० लाख ते १ कोटीची होती. २०१४ साली नाईक यांची हीच प्रॉपर्टी एक कोटी वरून आठ कोटींवर पोचली. २०१९ मधील निवडणूक प्रतिज्ञापत्रात आमदार नाईक यांनी आपली प्रॉपर्टी २५ कोटींची असल्याचे सांगितले आहे. ह्या अधिकृत प्रॉपर्टी आहेत, तर बेनामी प्रॉपर्टी १४० ते १५० कोटींची असल्याचा दावा आमदार नितेश राणेंनी केला. ही वाढलेली संपत्ती वैभव नाईक आणि चिपळूण वरून भाड्याने आलेल्या भटक्या कुत्र्यांनी एसीबीला उत्तर द्यावे. त्याऐवजी केंद्रीयमंत्री राणे, माजी खासदार निलेश राणे आणि माझ्यावर तसेच भाजपावर दात चावण्याला काय अर्थ ? असा सवालही नितेश यांनी केला.

वैभव नाईक यांच्या नातेवाईकांच्या व मित्रांच्या नावाने सिंधुदुर्ग अलिबाग पुणे कोल्हापूर सातारा, पुणे येथे शेतजमीन ४५ कोटी तर बिनशेती प्रॉपर्टी ३५ कोटींची आहे.लोअर परेल मध्ये, दादर मध्ये, पुणे रायगड, अलिबाग, मुरुड येथील फ्लॅटची किंमत ३५ कोटी आहे. त्याशिवाय व्यवसायिक प्रॉपर्टी ८० कोटींच्या बाहेर आहे. २००९ ते २०१९ या काळात आमदार वैभव नाईक यांची प्रॉपर्टी ३०० पटीने वाढली असा दावा त्यांनी केला आहे, हे आजच्या कुडाळमधील मोर्चात उन्हातान्हात सहभागी झालेल्या सामान्य शिवसैनिकांनी ऐकले पाहिजे. याचा जाब एसीबी ने विचारला तर हे सोंगाडे आणि भटके कुत्रे मोर्चा काढतात. एवढ्या बेनामी प्रॉपर्टी जर कोणी बनवल्या असतील तर त्याला चौकशीला सामोरे जावेच लागेल. या बेनामी मालमत्तेचे उत्तर त्या नपुंसक उद्धव ठाकरेंने, शिक्षकाच्या कारट्या भास्कर जाधवने द्यायला हवे. शेम्बड्या मुलासारखे रडत बसण्यापेक्षा हिंम्मत असेल तर भास्कर जाधवच्या मांडीवर बस आणि रत्नागिरीच्या एसीबी कार्यालयात जाऊन चौकशीला सामोरे जा आणि उत्तर द्या असे आव्हान आमदार नितेश राणेंनी वैभव नाईक याना दिले. ज्या राणेंवर भास्कर जाधव टीका करतात, ते जाधव स्वतःच्या मुलाला केवळ जिल्हा परिषद मध्ये पाठवू शकले. पण राणेंनी आपल्या मुलाला खासदार बनवले. मला दोन वेळा आमदार केले. राणे स्वतः मुख्यमंत्री झाले, केंद्रात मंत्री आहेत. भास्कर जाधव फक्त नगरविकास मंत्री होऊ शकले. अशा जहाल शब्दांत नितेश राणेंनी भास्कर जाधवांचा समाचार घेतला.

पंतप्रधान मोदी, देवेंद्र फडणवीस यांची नक्कल करणारा भास्कर जाधव हा नालायक माणूस आहे. शिंदे सरकार मध्ये येण्यासाठी भास्कर जाधव आणि वैभव नाईक यांनी किती खटाटोप केला हे आम्हाला माहिती आहे. त्यांना गेट आउट म्हणून सांगण्यात आले होते असा गौप्यस्फोटही नितेश राणेंनी केला.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:50 AM 19/Oct/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here