गोसेवा संघातर्फे उद्या गोपूजन, चित्र प्रदर्शनाचे आयोजन

0

रत्नागिरी : येथील गो सेवा संघ संस्थेच्या वतीने शुक्रवारी, दि. २१ ऑक्टोबर रोजी वसुबारस दिनी शहर व आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्या सर्व नागरिकांसाठी गाईंच्या पूजन कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यासोबतच गोसेवा संघाने आजपर्यंत केलेल्या सेवा कार्याची प्रचीती यावी व यातून गोपालक, गोसेवक तयार व्हावेत यासाठी चित्र प्रदर्शन भरविण्यात येणार आहे.

शहर व आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांसाठी प्रत्यक्ष गोपूजन व चित्र प्रदर्शन पाहण्यासाठी शुक्रवारी कुवारबाव येथील बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या समोर गजानन कन्स्ट्रक्शनच्या बाजूला गोशाळेमध्ये सायंकाळी ५ ते रात्री ८ यावेळेत अवश्य भेट द्यावी, असे आवाहन गो सेवा संघाने केले आहे. अधिक माहितीसाठी 9730305073, 9029996844 या क्रमांकांवर संपर्क साधावा.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:54 PM 20/Oct/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here