‘एकवेळ माणूस उपाशी राहिला तरीही चालेल मात्र फोटो पाहिजे’; आनंदाच्या शिधा वाटपावरुन सुप्रिया सुळेंची टीका

0

मुंबई : राज्य सरकारचं दिवाळी गिफ्ट अजून अनेक गावात पोहोचलं नाही आहे.
आनंदाच्या शिधा पिशव्यांवर पाहिजे असणारे फोटो हे महत्वाचे आहेत. एकवेळ माणूस उपाशी राहिला तरीही चालेल मात्र फोटो लागला पाहिजे, अशी खोचक टीका राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

त्या पुणे जिल्ह्यातील पुरंदरमध्ये बोलत होत्या. राज्य सरकारने सर्व सामान्यांची दिवाळी गोड व्हावी यासाठी 100 रुपयांमध्ये शिधा वाटपाची योजना आखली होती मात्र दिवाळी तोंडावर आली तरीही शिधा अजून काही ठिकाणी पोहचला नाही त्यावरुन सुप्रिया सुळेंनी राज्य सरकारवर निशाणा साधला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले होते की, असे उपक्रम जबाबदारीने राबवा. त्यामुळे महाराष्ट्र सरकारचा हा कॅज्युअल अप्रोच आहे. काहीतरी घाईघाईत अर्धवट करण्याचा प्रयत्न केला आहे. गरीबांसाठी जे कराल ते मनापासून करा. फोटो मध्ये अडकू नका, अशी माझी विनंती आहे. सेवा ही महत्त्वाची असते. फोटो हा महत्त्वाचा नसतो, असाही टोला सुप्रिया सुळे यांनी यावेळी लगावला. केंद्र आणि राज्य सरकारला सर्वसामन्यांचे घेणं-देणं नाही. स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत, असा आरोपही यावेळी त्यांनी केला.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:38 PM 21/Oct/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here