राष्ट्रीय आयोडीन न्यूनता विकार नियंत्रण कार्यक्रमाचे चिपळूण येथे उद्घाटन

0

रत्नागिरी : राष्ट्रीय आयोडीन न्यूनता विकार नियंत्रण कार्यक्रमाचे जिल्हास्तरीय आयोजन छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, पंचायत समिती चिपळूण येथे आज दिनांक 21.10.2022 रोजी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अनिरुध्द ए. आठल्ये यांच्या हस्ते करण्यात आले.

आयोडीनयुक्त मिठाचा रोजच्या आहारात वापर करणे फायदेशीर आहे. तर मीठ हे शक्ती आणि बुद्धीचा रक्षक आहे. आयोडीनचे दररोज सेवन तुम्हाला तंदुरुस्त ठेवते त्याचप्रमाणे शारीरिक वाढ आणि विकास, शरीरातील चयापचय नियमन इष्टतम मानसिक विकास, शरीरात उष्णता निर्माण करणे आणि शरीराचे तापमान राखणे. आपली भावी पिढी तसेच गरोदर माता शारीरिक व मानसिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी आयोडीनयुक्त मिठाचा वापर करणे आवश्यक आहे.

आयोडीनच्या अभावामुळे होणारे आजार 1) गलगंड 2) मुकबधिरता 3)अपंगत्व व मतिमंदता 4) जन्मतः व्यंगत्व.
वरीलप्रमाणे प्रकर्षाने जाणवणारे आजार व लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तसेच अधिक माहितीकरिता आशा / अंगणवाडी सेविका / आरोग्य कर्मचारी यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ.अनिरुध्द आठल्ये यांनी केले आहे. तालुक्यातील पाच (मंडणगड, दापोली, खेड, गुहागर व चिपळूण) समुदाय आरोग्य अधिकारी यांची सभा घेऊन, राष्ट्रीय कामांचा आढावा घेण्यात आला.

यावेळी त्यांचेसोबत तालुका आरोग्य अधिकारी चिपळूण डॉ.ज्योती एस. जाधव, तालुका आरोग्य अधिकारी गुहागर डॉ.घन:श्याम जांगीड, वैद्यकीय अधिकारी डॉ. यतिन व्ही. मयेकर, आरोग्य पर्यवेक्षक श्री. राजेंद्र रेळेकर, जिल्हा मुल्यमापन व सनियंत्रण अधिकारी श्री. प्रकाश पडगे, आरोग्य पर्यवेक्षक श्री. स्वप्नील चव्हाण, आरोग्य सहाय्यक श्री. मनोहर तायडे व आरोग्य कर्मचारी वृंद उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here