लवेल येथे पिकअप टेम्पोची एसटीला धडक

0

रत्नागिरी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील लवेल नाजिकच्या मसाल्याचा पाॅईंटजवळ चिपळूण येथून खेडला येणाऱ्या एस.टी. बसला पिकअप टेम्पोने जोरदार धडक दिली. टेम्पो चालकाचे नियंत्रण सुटल्याने टेंम्पोने बसच्या उजव्या बाजूस धडक दिली व अपघात झाला.

दोन्ही वाहनांच्या नुकसानीस व अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी टेंम्पो चालक आत्माराम तुकाराम तटकरे वय 67 रा. पाग गोपालकृष्ण चिपळूण जि रत्नागिरी याच्यावर गुन्हा रजिस्टर नंबर 296/2022 मध्ये भादवि 279,मोटर वाहन कायदा कलम 184 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी विठ्ठल तानाजी नागरगोजे एस. टी. ड्रायव्हर खेड बस डेपो यांनी येथील पोलीसात फिर्याद दाखल केली आहे.

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग 66 वरून एस.टी. ड्रायव्हर विठ्ठल तानाजी नागरगोजे वय 31 रा. एस. टी. डेपो खेड हे आपल्या ताब्यातील एस.टी बस नंबर एमएच 14 बीटी 2231 ही एस टी. बस मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरून चिपळूण ते खेड या मार्गावर चालवत होते. बस लवेल जवळील मसाल्याचा पाॅईंटजवळ आली असताना समोरून टाटा पिकअप टेंम्पो नंबर एमएच 08 W 5583 वरील चालक आत्माराम तुकाराम तटकरे याने आपल्या ताब्यातील टेंम्पो बेदरकारपणे चालवून समोरून येणा-या एस.टी. बसला उजव्या बाजुला धडक देऊन अपघात केला व अपघातास व दोन्ही वाहनांच्या नुकसानी सकारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघाताचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:49 PM 22/Oct/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here