लॉकडाऊन मध्ये देखील तळीरामांचा समंजसपणा…

0

रत्नागिरी : गायछाप १० रुपयांचा ४० रुपये, मॅकडोवेल १५० रुपयांची ४०० रुपयांना, डीएसपी ब्लॅक १४० रुपयांची ४०० रुपयांना, रॉयल स्टॅग १७० रुपयांची ४५० रुपयांना, रॉयल चॅलेंज २१० रुपयांची ४५० रुपयांना, ब्लेन्डर स्प्राईड ३२० रुपयांची ६०० रुपयांना, एल पी बिअर १४० ची ३०० रुपयांना तर टर्बो स्ट्रँाग १८० ची ३५० रुपयांना… होय हे खरं आहे लॉक डाऊनच्या काळात चोरट्या दारू विक्रीचे रेट दुप्पट ते तिप्पट होऊनही तळीरामांनी मात्र हु कि चू केलं नाही. एरवी डाळ, तेलाचे, पेट्रोल चे रेट २ रुपयांनी जरी वाढले तरी आकांडतांडव केला जातो. समस्त तळीरामांचा हा सोशिकपणा खरंच वाखाणण्यासारखाच आहे असेच एकार्थी म्हणावे लागेल. वाढीव दराबाबत कुणाची तक्रार नाही आंदोलन नाही पण दारू कुठे मिळते याची चुगली देखील कुणी पोलिसांकडे करत नाही इतका हा प्रामाणिक वर्ग आहे असेच म्हणावे लागेल. या कठीण समयी जो कुणी यांची गरज भागवतो त्याला ते आयुष्यभर विसरणार नाहीत असे देखील अनेकजण छातीठोकपणे सांगत असल्याचे बोलले जात आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
06:51 PM 25/Apr/2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here