आंबेड बुद्रुक गावच्या सर्वांगीण विकासासाठी सहकार्य करणार : ॲड. दीपक पटवर्धन

0

रत्नागिरी : आंबेड बुद्रुक गाव चे गाव विकास समिती चे नवनिर्वाचित सरपंच सुहास मायंगडे यांचा सत्कार भाजपा जिल्हा अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी केला. त्यावेळी त्यांच्या सोबत भाजपा कार्यकर्ते प्रकाश खापरे उपस्थित होते.

नवनिर्वाचित सरपंचा चे अभिनंदन करताना खूप आनंद होतो. मोठा जनाधार आणि अनुभव पाठीशी असलेले मायांगडे गवविकासासाठी उत्तम कार्य करतील. सरपंच व नवनिर्वाचीत सदस्य यांची टीम ग्रामपंचायती माध्यमातून उत्कृष्ट व लोकाभिमुख कामे करतील असा विश्वास ॲड. दीपक पटवर्धन यांनी व्यक्त केला.

भाजपा शासना माध्यमातून आम्हाला सहकार्य करा विकास योजना राबण्यासाठी मदत करा असे आवाहन या प्रसंगी सरपंच मायंगडे यांनी केले. या वेळी मा. रवींद्र चव्हाण बांधकाम मंत्री यांनीही दूरध्वनी वरून मायंगडे याचे अभिनंदन केले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:49 PM 22/Oct/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here