राजापुर : तालुक्यातील ओणी कोंडीवळे गावातील ग्रामस्थांनी कोरोना विषाणुच्या पार्श्वभुमीवर मुंबईत अडकलेल्या आपल्या गावातील चाकरमन्यांकरीता २ टन तांदूळ व १ टन डाळ गावातील घराघरातुन जमवुन त्याची पाकिटे तयार करुन मुंबईकर चाकरमन्यांना पाठवली आहेत. ओणी कोंडीवळे गावातील बहुसंख्य कुटुंब ही मुंबईस्थित आहेत. कोविड-19 या साथरोगामुळे देशभरात लॉगडाऊन असताना त्यांच्या घरात शिधेचा प्रश्न निर्माण होवुन मुलाबाळांची उपासमार होवु नये यासाठी ग्रामस्थांनी आठ दिवसांपुर्वी गावातील प्रमुख मंडळींनी पुढाकार घेवुन गावातील मुंबईत राहणा-या लोकांची यादी तयार केली व त्यांना प्रत्येकी पाच किलो धान्य मुंबईतील घरात घरपोहोच करण्याचा विचार झाला व तो प्रत्यक्षात उतरवुन ग्रामस्थांनी एकत्र येवुन शिधा गोळा करीत पाच किलोची पाकीटे तयार केली, मात्र वाहन परवानगीचा प्रश्न आल्यावर राजापुरचे आ. राजन साळवी यांच्या ग्रामपंचायत भेटी दरम्याने अडचण कळविण्यात आली. आ.साळवी यांनी थेट जिल्हाधिकारी रत्नागिरी यांचसोबत चर्चा करुन तोही प्रश्न मिटवल्याने धान्यासह गाडया मुंबईत रवाना झाल्या. या उपक्रमात ओणी कोंडिवळे गावविकास ग्रामस्थ मंडळ, गावप्रमुख प्रकाश लिंगायत, अनंत गुरव, पुनाजी लोळगे, विठ्ठल गोरुले नवगावातील बारा मानकरी व ग्रामस्थ मंडळ, श्रीदेव विमलेश्वर उत्कर्ष मंडळ ओणी कोंडीवळे व अनंत गोरुले, दिलीप दिवाडे, गोपाळ करंडे, विनायक ठुकरुल, विजय दैत, सुर्यकांत लोळगे, रमेश जानस्कर, सुभाष शिंदे, विलास पळसमकर व अशोक लिंगायत सहभागी होते.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
8:16 PM 25-Apr-20
