रमजान महिन्यात नमाज तराहवी घरातच पठण करावी : सैफ सुर्वे

0

रत्नागिरी : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पूर्ण देश आज लॉकडाऊन आहे. आणि अशा परिस्थितीत आपणही घरी बसून देशाला सहकार्य केलं पाहिजे. सर्व सण, उत्सव घरगुती पद्धतीने केले पाहिजेत. आता चालू असणाऱ्या पवित्र रमजान महिन्याच्या नागरिकांना मनपूर्वक शुभेच्छा देत महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना रत्नागिरीच्या वतीने रमजान महिन्यात नमाज तराहवी घरातच पठण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. या आठवड्यात सुरू झालेल्या रमजान महिन्यात मुस्लिम बांधवांनी मशजिद किंवा सार्वजनिक ठिकाणी एकत्र न येता आपापल्या घरात थांबुंनच नमाज, तराहवी, इफ्तार, धार्मिक प्रार्थना आदी धार्मिक कार्यक्रम पार पाडावेत, असे आवाहन महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनाचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सैफ सुर्वे व जिल्हा उपाध्यक्ष सरफराज घारे यांनी संस्थापक अध्यक्ष तथा महाराष्ट्र शासन ग्रह विभाग समन्वय समिती सदस्य मा. श्री. राहुल दुबाले यांच्या अध्यक्षतेखाली केलं आहे.

HTML tutorial

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
11:26 AM 26-Apr-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here