तब्बल वर्षभराने लागला ‘टीईटी’चा निकाल

0

पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेचा (टीईटी) निकाल तब्बल एक वर्षाने लागला आहे. या परीक्षेत 17 हजार 287 उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत.

टक्केवारीचा विचार करता 3.69 टक्के एवढा निकाल लागला आहे. अखेरीची टीईटी 21 नोव्हेंबर 2021 रोजी झाली होती. दरम्यान “टीईटी’ च्या काही परीक्षांमधील घोटाळे उघडकीस आले आहे. यात अपात्र उमेदवारांना पात्र ठरविण्यात आले होते. यामुळे मागील वर्षाचा निकाल रखडला होता. या परीक्षेसाठी 4 लाख 68 हजार 679 उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यातील 4 लाख 2 हजार 18 उमेदवार परीक्षेला बसले होते. 66 हजार 397 उमेदवार गैरहजर होते. परीक्षेत 3 लाख 82 हजार 562 उमेदवार अपात्र ठरविण्यात आले. 2 हजार 433 उमेदवारांचे निकाल राखीव ठेवण्यात आले आहेत.

पेपर क्रमांक 1 साठी 2 लाख 54 हजार 428 उमेदवारांची नोंदणी झाली होती. यात 2 लाख 16 हजार 579 उमेदवार परीक्षेला बसले होते. यातील 9 हजार 653 उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. याचा निकाल 3.79 टक्के एवढा लागला आहे. पेपर क्रमांक 2 साठी 2 लाख 14 हजार 251 उमेदवारांनी नोंदणी केली होती. यातील 7 हजार 634 उमेदवार उत्तीर्ण झाले असून 3.56 टक्के एवढा निकाल लागला आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:08 AM 24/Oct/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here