रत्नागिरी : लॉकडाऊन कालावधीत संपूर्ण देश बंद असताना रत्नागिरी शहरात राजरोसपणे ऑनलाईन पद्धतीने दारू विक्री केली जात आहे कि काय ? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. रत्नागिरी शहरातील दोन मद्यविक्री करणाऱ्या दुकानांच्या नावाने चक्क फेसबुक पेज सुरु करून त्यावर दारूची ऑर्डर घेऊन घरपोच डिलिव्हरी केले जात असल्याचे बोलले जात आहे. हि फेसबुकपेज ज्या दुकानांच्या नावाने सुरु करण्यात आली आहेत त्यांच्या मालकांशी रत्नागिरी खबरदारने संपर्क साधला असता असे कोणतेही पेज आम्ही सुरु केले नसल्याची माहिती त्यांनी दिली आहे. याबाबत एका दुकानदाराने पोलिसांकडे तक्रार दिली असून दुसरा दुकानदार देखील तक्रार देण्यासाठी पोलीस स्थानकात पोहचला आहे. या फेसबुक पेजवर दारूची ऑर्डर देण्यासाठी मोबाईल नंबर देखील देण्यात आला आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
12:38 PM 27/Apr/2020
