देव-घैसास-कीर महाविद्यालयात परीक्षापूर्व समुपदेशन कार्यशाळा

0

रत्नागिरी : भारत शिक्षण मंडळाच्या देव, पैसास, कीर वरिष्ठ महाविद्यालयात परीक्षा विभाग व समुपदेशन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यासाठी परीक्षापूर्व समुपदेशन मार्गदर्शन कार्यशाळा झाली.

विनय कलमकर यांनी विद्यार्थ्यांना सत्र १ परीक्षेची तयारी कशी करावी, परीक्षेचे स्वरूप, परीक्षा काळात ताणतणावापासून कसे दूर रहायचे याबाबत मार्गदर्शन केले.

कार्यशाळेला प्रभारी प्राचार्या मधुरा पाटील, उपप्राचार्या वसुंधरा जाधव, विभागातील इतर प्राध्यापक व विद्यार्थी वर्ग उपस्थित होते. या समुपदेशन कार्यशाळेचे प्रास्ताविक समुपदेशन विभाग प्रमुख ऋतुजा भोवड यांनी केले. सूत्रसंचालन राखी साळगावकर यांनी केले तर वैभव कीर यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here