दारू दुकाने घरपोच दारू पुरवत नाहीत, पैसे भरण्याच्या लिंक बनावट : नागपूर पोलीस

0

रत्नागिरी : लॉकडाऊन कालावधीत अनेकांची गरज ओळखून भामटेगिरीचा नवा फंडा काहींनी शोधल्याचे निदर्शनास येत आहे. एटीएम पिन विचारून ऑनलाईन गंडा घालण्याची पद्धत आता परिस्थितीनुसार बदलल्याचे दिसून येत आहे. फेसबुकवर ऑनलाईन पद्धतीने दारू विक्री ? याबाबतचे वृत्त रत्नागिरी खबरदार वर प्रसिद्ध होताच रत्नागिरीत सर्वत्र खळबळ उडाली. रत्नागिरीतील ज्या दुकानांच्या नावाने हि खोटी पेज तयार करण्यात आली त्या दुकान चालकांनी पोलिसात रीतसर तक्रार देखील दिली आहे. याच दरम्याने नागपूर पोलिसांनी एक ट्वीट करत अशा घटनांवर प्रकाश टाकल्याचे दिसून येत आहे. दारू दुकाने घरपोच दारू पुरवत नाहीत, पैसे भरण्याच्या लिंक बनावट असू शकतात व यातून नागरिकांची फसवणूक होऊ शकते असा इशारा नागपूर पोलिसांनी दिला आहे. सायबर फसवणूक अद्यापही थांबली नाही आहे, इंटरनेटवर आढळून आलेल्या दारू विक्रीच्या जाहिराती खोट्या असल्याचा खुलासा नागपूर पोलिसांनी केला आहे. देशभरातील दारू विक्री करणाऱ्या दुकानांच्या नावाने खोटी फेसबुक पेज तयार करून त्यावर ऑर्डर घेण्याच्या नावाखाली पेमेंट लिंक देऊन पैसे उकळण्याचा धंदा काहींनी सुरु केल्याचे रत्नागिरी खबरदारच्या टीमला निदर्शनास येत आहे.

HTML tutorial

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
01:08 PM 27/Apr/2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here