रत्नागिरी : जयगडजवळच्या सांडेलावगण-कासारी खाडीत कालवे काढण्यासाठी गेलेले दोघे बुडाल्याची घटना दि. २५ एप्रिल रोजी घडली होती. त्यातील एकाचा मृतदेह लगेच सापडला होता. दुसऱ्या बेपत्ता तरुणाचा मृतदेह रविवारी सकाळी हाती लागला. बुडालेल्या ठिकाणापासून १० फूट अंतरावर हा मृतदेह सापडला. सांडेलावगण-कासारी खाडीवर कालवे काढण्यासाठी गेलेल्या चाफेरी गावच्या दोन ग्रामस्थांचा पाण्याचा अंदाज न आल्याने खाडीमध्ये ओहोटीच्या प्रवाहात वाहत जाऊन बुडून मृत्यू झाला. त्यापैकी एकाचा मृतदेह लगेच सापडला. संतोष तुकाराम पिंपळे यांचा शोध सुरु होता. काल सकाळी नऊ वाजता तो मृतदेह सापडला. खाडीतील चिखल आणि कमरेला असलेली कालव्यांची पिशवी यामुळे हा तरुण त्याच ठिकाणी रुतला असावा, अशी शक्यता आहे.
