राजापूर : तालुक्यातील जिजामाता हायस्कूल रायपाटण समोरील रोडवर फिर्यादी राजेश सदानंद नलावडे वय ४५ रा. रायपाटण यांना मारहाण केल्याप्रकरणी राजापूर पोलिसांनी ७ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी व त्यांचे मित्र पेपर मध्ये आलेल्या बातमीची चर्चा करीत असताना संशयित आरोपी मंगेश केशव पराडकर, अमोल अशोक शेट्ये, उमेश केशव पराडकर, जितु मोहन गांगण, महेश रवींद्र गांगण, महेश महादेव ताम्हणकर, बाबा कांबळी सर्व रा. रायपाटण यांनी बेकायदेशीर जमाव करून फिर्यादी व त्यांचे सोबत असणारे संतोष गांगण यांना लाथाबुक्क्याने मारहाण केली व कोविड १९ च्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे लागू असणाऱ्या संचारबंदीचे उलंघन केले म्हणून राजापूर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी पोलीस स्थानकात करण्यात आल्या आहेत.
