स्टेट बँक कॉलनी येथे ५० वर्षीय इसमाचे दगडाने डोके फोडले

0

रत्नागिरी : माझ्या घरासमोर मोठमोठ्याने ओरडत व शिवीगाळ करत भांडण करू नका, माझा मुलगा आभ्यास करतोय असे सांगणाऱ्या नागरिकाच्या अंगावर धावून जात त्याच्या डोक्यावर दगड मारून दुखापत केल्याची घटना स्टेट बँक कॉलनी येथे घडली आहे. फिर्यादी राजेश सुधाकर नेने वय ५० रा. स्टेट बँक कॉलनी रत्नागिरी यांनी याबाबत रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात तक्रार दिली आहे. संशयित आरोपी संदीप विटकरी रा. क्रांतीनगर व तीन माणसे घरासमोर शिवीगाळ करीत भांडत होती व त्यावेळी तुम्ही येथून निघून जा असे सांगावयास गेलेल्या फिर्यादी यांना हि मारहाण झाली आहे. पोलिसांनी याबाबत शहर पोलीस स्थानकात संशयित आरोपीवर भा. दं. वि. क. ३३६, ३३७, ३५२, ५०४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here