रत्नागिरी : जिल्ह्याने कोरोनावर 99 टक्के मात केली आहे. जिल्हा रुग्णालयातून तपासणीसाठी पाठवण्यात आलेल्या प्रलंबित 13 अहवालांपैकी 12 अहवाल जिल्हा रुग्णालयाकडे प्राप्त झाले आहेत. प्राप्त झालेले 12 च्या 12 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. केवळ एका संशयिताचा अहवाल येणे बाकी आहे.
