रत्नागिरी : लॉकडाऊन मधील नियमांचे उल्लंघन करीत तेली आळी नाका, राम आळी व शहरातील बाजारपेठ येथील काही व्यापाऱ्यानी आपली दुकाने उघडली होती. पोलिसांनी या दुकानदारांची चांगली खरडपट्टी काढत ही दुकाने बंद करायला लावली आहेत. बहुसंख्य व्यापारी नियमांचे पालन करीत असताना काही चारदोन व्यापारी नियमांचे उल्लंघन करीत करीत असल्याचे दिसून येत असून अशा व्यापाऱ्यांचे परवाने रद्द करण्याची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
