कलाधिपती कला मंच असुर्डे यांनी साकारली अंजनवेल येथील गोपाळगडाची हुबेहूब प्रतिकृती

0

रत्नागिरी : असुर्डे येथील कलाधिपती कला मंच या मंडळाने गुहागर तालुक्यातील अंजनवेल येथील अरबी समुद्रा लगत असलेल्या डोंगरावरील भव्य शिवकालीन गोपाळगडाची हुबेहुब प्रतिकृती ३५ फूट बाय ४० फूट व ६ फूट उंचीच्या अश्या भव्य आकारमानात साकारल्यामुळे संपूर्ण परिसरात आकर्षण ठरली आहे.

गेले २५ दिवस मंडळातील प्रमुख कलाकार: आदित्य साळवी ,हर्षद दळवी, ओंकार सावंत, विराज साळवी, वेदांत सावंत, सोहम घोडे, मनीष वैष्णव, विपुल साळवी,कुणाल साळवी, समय थरवळ तसेच सहकारी कलाकार अथर्व दळवी, आयुष दळवी, चैतन्य साळवी, नम्रता वैष्णव, दिपाली दळवी, दिशा साळवी, अनुष्का दळवी,मंथन साळवी, गौरी साळवी, कस्तुरी गुजर,टीना वैष्णव, सिद्धेश साळवी, ऋग्वेद बेर्डे, चिंतन थरवळ, सुयश घोडे, चिन्मय थरवळ, शिवानी साळवी, राज वरेकर, साहिल भंडारी, राहुल जाधव, सुयश शिगवण, करण आदवडे, प्रसाद धनावडे या सर्व सदस्यांनी अविरत मेहनत घेऊन अवकाळी पावसासारखे अनेक अडथळे येऊन सुद्धा गडाचे काम यशवस्वी रित्या पूर्ण केले व तसेच आपल्या कल्पकतेतून व कलेतून इतिहासाची आठवण करून देण्याचा प्रयत्न केला आहे.

हे मंडळ नेहमी विविध सामाजिक व कलाक्षेत्रातील उपक्रमांमध्ये आपली सामाजिक बांधीलकी व खेडेगावातील कलाकारांना प्रोस्थाहन मिळावे यासाठी विविध उपक्रमांमध्ये अग्रेसर असते याचाच एक भाग म्हणून हा उपक्रम राबवला असून मुलांमध्ये एकजुटीची भावना निर्माण व्हावी तसेच परिसरातील दुर्लक्षित ऐतिहासिक वास्तू, लेणी, गडकिल्ले सर्वसामान्यांपर्यंत पोहचाव्यात व त्या आताच्या पिढीने जतन करून आपल्या महाराष्ट्राचे वैभव आपला पराक्रमी इतिहास पुढच्या पिढीला माहिती व्हावा हाच या मंडळाचा मुख्य उद्धेश आहे. तसेच मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी हे मंडळ असे उपक्रम राबवीत असते.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:35 PM 27/Oct/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here