मिरजोळे : हनुमान नगर, मिरजोळे येथील प्रतिष्ठित व सामाजिक जाण असलेले नागरिक श्री.अरूण नवरे यांच्या संकल्पनेतुन त्यांचे कुटूंबिय, तसेच सदानंद मालप, गणेश गुळवणीसर, रविंद्र साळुंखे, विजय बेहरे यांनी स्वेच्छेने निधी जमवून मिरजोळे येथील लक्ष्मीकांत वाडी, मधली वाडी, पाडावे वाडी व हनुमान नगर येथील कोरोना लॉकडाउनमुळे अडचणीत सापडलेल्या गरजुंना तांदूळ ,गहू, ज्वारी व किराणा सामानाचे वाटप करण्यात आले. विशेषतः निराधार, अपंग, रोजंदारी करणारे ज्यांना निकडीची गरज आहे अश्यांना मदत करण्यात आली. यावेळी माजी सरपंच गजानन गुरव, उपसरपंच गणेश पाडावे, पाडावेवाडी मंडळ अध्यक्ष दिपक गावकर, यांचे सहकार्य लाभले. मदतीचे वितरण अरूण नवरे साहेब, सदानंद मालपसर, रविंद्र साळुंखे, विजय बेहरे, गणेश गुळवणीसर, मोहन खानविलकर, मनोहर मेस्री यांचे हस्ते करण्यात आले. शुभम गुरव यांनी मोफत टेंपो देऊन सहकार्य केले.
