कोकणनगर येथे इसमाची गळफास घेवून आत्महत्या

0

रत्नागिरी : शहरानजीकच्या कोकणनगर येथील इसमाने अज्ञात कारणातून राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी 1 वा. सुमारास उघडकीस आली. यल्लप्पा शंकर हट्टीकर (65, रा. कोकणनगर, रत्नागिरी) असे आत्महत्या केलेल्या प्रौढाचे नाव आहे. याबाबत त्यांचा भाऊ सुरेश शंकर हट्टीकर (55, रा. नाचणे, रत्नागिरी) यांनी शहर पोलिसाना खबर दिली. त्यानुसार, यल्लप्पा हे पत्नीसह कोकणनगर येथे राहत होते. मंगळवारी दुपारी त्यांची पत्नी दूध आणण्यासाठी घराबाहेर गेली होती. ती परतली असता तिला घराचा दरवाजा बंद दिसला म्हणून तिने पतीला हाक मारली. परंतु घरातून कोणताही प्रतिसाद न आल्याने तिने शेजाऱ्यांना हि बाब सांगितली. शेजाऱ्यांनी घराची कौले काढून पहिले असता त्यांना घराच्या मागील पडवीत लोखंडी पाईपला ओढणीने गळफास घेतलेल्या अवस्थेत यल्लप्पा दिसून आले. त्यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. याबाबत शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

HTML tutorial

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
6:43 PM 28-Apr-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here