शेतकरी बांधवांना सावरता येत नसेल; तर सरकारने चालते व्हावे : आदित्य ठाकरे

0

पुणे : राज्यात गद्दारीने स्थानापन्न झालेल्या घटनाबाह्य सरकारचे निर्दयीपणे काम चालू असून, लोकसेवा विसरून सत्तेत मश्गुल झालेल्या सत्ताधाऱ्यांचा केवळ राजकारणावर फोकस आहे.

सद्यस्थितीत अस्मानी संकटामुळे हवालदील झालेल्या शेतकरी बांधवांना सावरता येत नसेल; तर सरकारने चालते व्हावे, असा इशारा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज येथे दिला. गावोगावच्या शेतकऱ्यांनी सर्व मंत्र्यांसाठी ‘नूकसान भरपाई देता की घरी जाता’ हा नारा बुलंद करावा, असे आवाहनही त्यांनी केले. परतीचा अवकाळी पाऊस आणि ढगफूटीने झालेल्या नूकसानीची पाहणी करण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी शिरूर तालुक्याचा दौरा केला.

यावेळी विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते सचिन आहिर, संपर्क प्रमुख अविनाश रहाणे, जिल्हाप्रमुख सुरेश भोर व ज्ञानेश्वर कटके, जिल्हा संघटक संजय देशमुख आदी नेते उपस्थित होते.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:14 AM 28/Oct/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here