जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधासाठी दहा हजार रक्षकांची फौज तैनात

0

रत्नागिरी : करोनाच्या प्रतिबंधासाठी परजिल्ह्यांसह परदेशातून आलेल्यांवर लक्ष ठेवणे, त्यांची तपासणी करणे आणि गावागावात सुरक्षिततेसाठी जनजागृती करणे यासाठी जिल्हा परिषदेने दहा हजाराहून अधिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. हे सारे रक्षक जिल्ह्यातील गावांमधील वाडी-वस्त्यांवर सज्जतेने काम करत आहेत. आरोग्य कर्मचारी, ग्रामसेवक, अंगणवाडी कर्मचारी, आशा स्वयंसेविकांचा त्यात समावेश आहे. रत्नागिरी जिल्हा परिषदेचे नियमित १२१ डॉक्टर्स, ४२ औषध निर्माण अधिकारी, १८ आरोग्य पर्यवेक्षक, १५० आरोग्य सहाय्यक, २३५ आरोग्य सेवक, ५६ आरोग्य सहाय्यिका, ३४५ आरोग्य सेविका, १०१ कंत्राटी आरोग्य सेविका, ९४ अंगणवाडी पर्यवेक्षक, दोन हजार ७७६ अंगणवाडी सेविका, दोन हजार १०० मदतनीस, ६९ गटप्रवर्तक, एक हजार २८५ आशा, राष्ट्रीय आरोग्य अभियानातील ६३ कर्मचारी, ३५ ग्रामपंचायत विस्तार अधिकारी, ७६४ ग्रामसेवक, ३४४ तलाठी, एक हजार ३७० ग्रामपंचायत कर्मचारी आणि जिल्हा परिषदेच्या इतर विभागांमधील ३० कर्मचाऱ्यांचा या फौजेत समावेश आहे. मार्च महिन्यात जिल्ह्यात करोनाचा पहिला रुग्ण सापडल्यानंतर जिल्हा परिषदेची यंत्रणा कार्यान्वित झाली. महिन्याभराच्या कालावधीत घेतलेल्या मेहतनीमुळे जिल्हा करोनामुक्तीच्या उंबरठ्यावर आहे. करोनाचे सावट निर्माण झाल्यापासून शहरातून मोठ्या संख्येने लोक ग्रामीण भागात येत होते. आतापर्यंत सुमारे दीड लाख लोकांच्या हातावर होम क्वारंटाइनचे शिक्के मारण्यात आले. हे काम गाव, वाडी-वस्तीवर कार्यरत कर्मचार्यांोनी केले. रुग्णालयासारख्या इन्स्टिट्युशनल क्वारंटाइनसाठी ग्रामीण भागातील ४० हून अधिक ठिकाणे निश्चित केली आहेत. त्यात जिल्हा परिषद शाळा, हायस्कूल, महाविद्यालय, हॉस्टेल्स तसेच मदरशांचा समावेश आहे. जिल्हा आरोग्य विभागात पाठपुरावा कक्ष (फिड बँक सेंटर) निर्माण करण्यात आला. त्या ठिकाणाहून दररोज किमान दोनशे फोन केले जात आहेत. त्याद्वारे क्वारंटाइन लोकांना भेटी दिल्या जातात का, कार्यक्षेत्रात काम करणारे कर्मचारी स्वतःची पुरेशी काळजी घेतात का, कर्मचार्यांलना कार्यक्षेत्रात काही अडीअडचणी येतात का, याची चौकशी फोनवर केली जाते. घरोघरी पाहणी करून गावकर्यांतना कोणत्या आजाराचा त्रास होत नाही ना, याचीही नोंद घेतली जात आहे. खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांकडे येणार्याज रुग्णांची नोंद केली जात असून सर्दी, खोकला किंवा ताप असणार्या रुग्णांचाही पाठपुरावा आरोग्य कर्मचारी करत आहेत. त्याचा अहवाल तालुक्यांकडून जिल्ह्याला आणि जिल्ह्यामार्फत शासनाला नियमित सादर केला जात आहे. त्यामुळे जिल्ह्याचे करोनाविषयीचे चित्र स्पष्ट व्हायला मदत होत आहे.

HTML tutorial

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
9:58 AM 29-Apr-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here