रत्नागिरी : जिल्हा रुग्णालयातून तपासणीसाठी पाठवण्यात आलेल्या प्रलंबित 13 अहवालांपैकी 12 अहवाल जिल्हा रुग्णालयाकडे प्राप्त होवून 12 च्या 12 अहवाल निगेटिव्ह आले होते. केवळ एका संशयिताचा अहवाल प्रलंबित असल्याची माहिती पुढे येत असतानाच अजून 17 अहवाल प्रलंबित असल्याचा आकडा प्रशासनाने दिला आहे. सध्या छुप्या मार्गाने जिल्ह्यात बाहेर गावाहून येणार्याची संख्या वाढत आहे. सर्दी, खोकला आदी संशयित रुग्णही दाखल होत आहेत. यामुळे कोरोना संशयितांच्या नमुन्याच्या अहवालाचा आकडा वाढत आहे. जिल्ह्यातील एकूण 540 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर, जिल्ह्यात 17 जणांचे अहवाल प्रलंबित राहिले आहेत.
