राजापुरातील अंजनेश्वर मंदिरात २ नोव्हेंबर रोजी निशाणकाठी नूतनीकरण कार्यक्रम

0

राजापूर : राजापूर तालुक्यातील मिठगवाणे येथील बारावाड्यांचे आराध्य दैवत श्री देव अंजनेश्वर मंदिर या मंदिरातील निशाणकाठी नूतनीकरण कार्यक्रम दि. २ नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजल्यापासून दुपारी एक वाजेपर्यंत होणार आहे.

कोकणातील मंदिरातील मंदिराचे भूषण म्हणजे निशाणकाठी असते ही निशाणकाठी विशिष्ट आकाराची सागवान या झाडापासून बनवलेली सुमारे ४० ते ५० फूट उंचीची असते. सध्याच्या निशाणकाठीचे लाकूड तडकले, कमकुवत झाले आहे. त्यामुळे निशाणकाठी बदलणे गरजेचे झाले आहे. सध्याच्या निशाणकाठीवर तांब्याचीप्लेट बसवलेली असून, संपूर्ण ताब्याची प्लेट बसवलेली असून, सपूर्ण माहिती लिहिलेली आहे. स्थापना मिती फाल्गुन शुद्ध १० शके १८६६ अशी अक्षरे तांब्याच्या प्लेटवर कोरलेली आहेत. म्हणजेच होळी पौर्णिमेच्या पूर्वी पाच दिवस हे निशाणकाठी स्थापनेचे कार्य झालेले आहे. शकसाल लक्षात घेतले तर या सध्याच्या उभ्या असलेल्या निशाणकाठीला ७७ वर्षे झालेली आहेत. यामुळे आता नवीन निशाणकाठी स्थापन करणे अपरिहार्य झाले आहे.

मंदिराजवळील नरेश कांबळीच्या घरानजीक नवीन निशाणकाठीचे सुतार काम सुरू असून, ते अंतिम टप्प्यात आले आहे. ही नवीन निशाणकाठी वाजत गाजत मिरवणुकीने श्री देवांच्या मंदिरात आणली जाणार आहे. बारा खोतांच्या प्रमुख उपस्थितीत हा नवीन निशाणकाठी स्थापनेचा उत्सव होणार आहे. या आनंदमय सुख सोहळ्यात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन श्रीदेव अंजनेश्वर मंदिर ट्रस्ट यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here