चंद्रकांत पाटीलांच्या उपस्थितीत वाजवले राष्ट्रवादीचे प्रचार गीत

0

पुणे : पुण्याचे पालकमंत्री आणि भाजपा नेते चंद्रकांत पाटील आज पुण्यात होते.

एका कार्यक्रमासाठी ते आले होते. आणि पाटील येताच मोठ्या आवाजात स्पीकरवर गाणं लागलं, राष्ट्रवादी पुन्हा…. बरं गोष्ट एवढ्यावर संपत नाही. पोलिसांनी तिथे गाणं वाजवणाऱ्या डीजेला अटक केली आहे.

पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील दिवाळीनिमित्त आयोजित एका कार्यक्रमात पुण्यातल्या रास्ता पेठेत आले होते. पाटील कार्यक्रमस्थळी येताच तिथे उपस्थित असलेल्या डीजेने अचानक राष्ट्रवादी काँग्रेसचं प्रचार गीत लावलं. यानंतर उपस्थितांमध्ये थोडासा गोंधळ कुजबूज झाली आणि त्यानंतर मात्र पोलिसांनी या डीजेला ताब्यात घेतलं.पोलिसांनी हे गाणं वाजवणाऱ्या डीजेला ताब्यात घेत त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. यावेळी पोलिसांनी, त्याने साऊंड सिस्टीम उभारण्यासाठी परवानगी घेतलेली नव्हती असं कारण दिलं आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
05:52 PM 28/Oct/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here