जगभरात कोरोनाचे थैमान; कोरोनाग्रस्तांचा आकडा 31 लाखांच्या पार

0

2 लाख 17 हजारांच्या वर जगभरात कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झालेल्यांची संख्या पोहोचली असून यासंदर्भात वर्ल्डोमीटरने दिलेल्या आकडेवारीनुसार आतापर्यंत जगभरात जीवघेण्या कोरोना व्हायरसमुळे 2 लाख 17 हजार 799 लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचे 76,286 नवे रुग्ण मागील 24 तासात सापडले आहेत. तर जगभरातील कोरोनाचा संसर्ग झालेल्यांचा आकडा 31 लाख 36 हजार 232 वर पोहोचला आहे. दिलासादायक म्हणजे जगभरातील 9 लाख 53 हजार जण कोरोना मुक्त झाले आहेत. तर जगात मागील 24 तासात 6351 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाचा कहर जगभरातील 210 देशांमध्ये सुरुच आहे. महासत्ता असलेल्या अमेरिकेला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. जगात जवळपास एक चतुर्थांश मृत्यू एकट्या अमेरिकेत झाले आहेत. अमेरिकेत 10,35,765 कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर 59,266 लोकांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे. अमेरिकेनंतर स्पेनमध्ये कोरोनामुळे 23,822 लोकांचा मृत्यू झाला आहे. स्पेनमधील 2,32,128 लोकांना कोरोनाची लागण झाली. इटली कोरोनाच्या मृत्यूंच्या आकड्यावारीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. इटलीत आतापर्यंत 26,977 मृत्यू झाले आहेत. तर कोरोनाबाधितांचा आकडा 1,97,414 इतका आहे. जगात अमेरिका, स्पेन, इटली, फ्रांस, ब्रिटन हे पाच असे देश आहेत जिथे कोरोनामुळे 20 हजाराहून अधिक बळी गेले आहेत. एकट्या अमेरिकेत कोरोनाचे 50 हजारांहून अधिक बळी गेले आहेत. संपूर्ण जगाला कोरोनाने आपल्या विळख्यात घेतले आहे. अशातच जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावाबाबत इशारा दिला आहे. कोरोनाचा आफ्रिका, पूर्व युरोप, लॅटीन अमेरिका आणि आशियामधील काही देशांमध्ये वाढणारा आकडा चिंताजनक असल्याचे मत संघटनेच्या प्रमुखांनी व्यक्त केले आहे. कोरोनाचा खात्मा होण्यासाठी अजून खूप वेळ असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस ऍधानॉम घेबरेयेसस यांनी युरोपीय देशांमध्ये शिथील करण्यात आलेल्या लॉकडाऊनबाबत बोलताना सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here