टी20 विश्वचषक 2022: पाकिस्तानचं सेमीफायनलमध्ये पोहोचणं भारताच्या हातात, जाणून घ्या संपूर्ण गणित..

0

सध्या टी20 क्रिकेटमध्ये एक अव्वल दर्जाचा बोलिंग अटॅक असूनही पाकिस्तान संघाला टी20 विश्वचषक स्पर्धेत खास कामगिरी करता आलेली नाही.

आधी भारत आणि मग झिम्बाब्वे अशा दोन्ही संघाकडून पाकिस्तानला पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे ग्रुप 1 च्या पाँईंट्स टेबलमध्येही पाकिस्तान 6 पैकी 5 व्या स्थानावर आहे. त्यामुळे पाकिस्तान सेमीफायनलमध्ये पोहोचणं तसं अवघडचं आहे. पण असं असलं तरी पाकिस्तानचं सेमीफायनलमध्ये पोहोचणं अजूनही शक्य आहे, पाकिस्तानचा सेमीफायनलचं तिकीट भारताच्या खेळीवर अवलंबून आहे.

पाकिस्तान सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी त्यांना त्यांचे उर्वरीत सामने अगदी मोठ्या फरकाने जिंकावे लागतील. ज्याने त्यांचा नेट रनरेट वाढेल. तसंच भारताशिवाय ग्रुप 1 मधील इतर संघानी खराब कामगिरी केल्यास पाकिस्तानला फायदा होईल. सर्वात आधी भारताला दक्षिण आफ्रिकेसह इतर सर्व सामने जिंकावे लागतील. तसंच बांग्लादेशला एक आणि झिम्बाब्वेसह दक्षिण आफ्रिकेला किमान दोन सामने गमावावे लागतील आणि असं सर्व झाल्यास पाकिस्तानचे सेमीफायनलमध्ये पोहोचण्याचे चान्सेस आहेत. त्यात ग्रुप 1 मध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका दमदार फॉर्मात असून झिम्बाब्वेही चांगली खेळी करतान दिसत आहे. त्यामुळे आधीच या तिघांमध्ये चुरस असल्याने पाकिस्तानचं सेमीमध्ये पोहोचणं अत्यंत अवघड आहे.

असा आहे ग्रुप 2 चा पॉईंट टेबल

संघसामनेविजयपराभवगुणनेट रन रेट
भारत22041.425
दक्षिण आफ्रिका1035.200
झिम्बाब्वे21030.050
बांग्लादेश2112-2.375
पाकिस्तान2020-0.050
नेदरलँड2020-1.625

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:23 PM 29/Oct/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here