साखरप्यात ‘एक दिवा शहिदांसाठी’ उपक्रम

0

साखरपा : सीमेवर लढणाऱ्या सैनिकांची आठवण म्हणून एक दिवा शहिदांसाठी हा उपक्रम साखरपा येथे राबवण्यात आला.

भाजप आणि मनसे यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम करण्यात आला. दिवाळी हा सण देशभर सर्वत्र साजरा होत असताना सीमेवर देशरक्षणासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या जवानांची आठवण रहावी या उद्देशाने एक दिवा शहिदांसाठी ही उपक्रम साखरपा इथे राबवण्यात आला. रविवारी दिवाळीच्या पूर्वसंध्येला हा उपक्रम राबवून हुतात्मा सैनिकांना आदरांजली अर्पण करण्यात आली. कोंडगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ सायंकाळी दीपप्रज्वलन करून ही मानवंदना देण्यात आली.

भाजप आणि मनसे यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमात अमित केतकर, सुरेश गांधी, श्रीधर कबनुरकर, बबलू शिर्के यांच्यासह भिकाजी दुधाने, कौस्तुभ केतकर आदी भाजप आणि मनसे कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here