रत्नागिरी : कोरोना प्रतिबंधासाठी अनेकजण आपापल्या परीने शासनाला मदत करत आहे. नाणीज येथील जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानने पंतप्रधान निधीला ५२ लाख रुपयांचा निधी गुरुवारी दिला. रत्नागिरीचे निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड यांच्याकडे हा धनादेश सुपूर्द करण्यात आला. संस्थानतर्फे उपकार्यकारी अधिकारी राजन बोडेकर यांनी हा धनादेश दिला. संस्थानने यापूर्वी १ एप्रिलला मुख्यमंत्री निधीला ५० लाखांचा निधी दिला आहे. त्यामुळे संस्थानने एकूण १ कोटी २ लाखांचा निधी राज्य आणि केंद्र सरकारला देऊन आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे.
