मुंबई : ‘आज 1 मे अर्थात महाराष्ट्र दिन तसंच कामगार दिन. दरवर्षी राज्यात महाराष्ट्र दिन मोठ्या धुमधडाक्यात आणि मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. परंतू यंदाच्या वर्षी कोरोनाने आल्या आनंदावर विरजन टाकले आहे. परंतू आपणाला या कोरोनारूपी संकटाला हरवून पुन्हा आपला महाराष्ट्र ताकदीने उभा करायचा आहे’, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र दिनाच्या तसंच कामगार दिनाच्या महाराष्ट्राच्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
