रिसॉर्टच्या नावाने बुकिंगसाठी २९ हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक

0

रत्नागिरी : तालुक्यातील गणपतीपुळे येथील रिसॉर्टच्या नावाने बुकिंगसाठी २९ हजार रुपये स्वीकारून रिसॉर्ट आणि ग्राहकांची ऑनलाईन फसवणूक केली. याप्रकरणी अज्ञाताविरोधात जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना १२ ऑक्टोबर ते २७ ऑक्टोबर २०२२ या कालावधीत घडली आहे. याबाबत गणपतीपुळे येथील हॉटेल ग्रीनलीफ द रिसॉर्ट अँड स्पामध्ये नोकरी करणारे पंकज अनिल नेमाडे (वय २५, मूळ रा. भुसावळ, जळगाव) यांनी तक्रार दिली आहे.

त्यानुसार, अज्ञाताने हॉटेलच्या नावाने गुगल मॅप सर्च इंजिनवरील बिझनेस लिस्टिंगमध्ये अनधिकृतपणे प्रवेश केला. त्यानंतर हॉटेलचा संपर्क क्रमांक आणि ई-मेल आयडी बदलन त्याजागी स्वतःचा क्रमांक आणि ई-मेल आयडी टाकला. त्याद्वारे हॉटेलमध्ये येणाऱ्या ग्राहकांना रूम बुक करण्यासाठी भाग पाडून २९ हजार रुपये घेऊन हॉटेल आणि ग्राहकांची ऑनलाईन फसवणक केली. अधिक तपास पोलिस निरीक्षक विनीत चौधरी करत आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:14 PM 31/Oct/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here