मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीच्या प्रश्नामुळे सध्या राज्यात राजकीय पेच उभा राहिला आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज ध्वजारोहण केल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री आणि राज्यापालांमध्ये सुमारे २० मिनिटे चर्चा झाली. मिलिंद नार्वेकर, अजोय मेहता मुख्यमंत्र्यांसोबत उपस्थित होते. या भेटीदरम्यानचे कारण अजून अस्पष्टच आहे.
