पतसंस्था अद्ययावत करणारे नवे संचालक ग्राहकांचा विश्वास अधिक दृढ करतील : राजन मलुष्टे

0

राधाकृष्ण नागरी सहकारी पतपेढीच्या आरटीजीएस, एनईएफटी, एसएमएस सेवेचा शुभारंभ

रत्नागिरी : तालुक्यातील नामवंत पतसंस्था म्हणून ओळख असणाऱ्या राधाकृष्ण नागरी पतसंस्थेने ३० ऑक्टोबर २०२२ रोजी ४० वर्षे पूर्ण करीत ४१ व्या वर्षात पदार्पण केले. या मुहूर्तावर पतसंस्थेच्या अद्ययावत प्रणालीचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. ४० वर्षांपूर्वीची हि पतसंस्था हि बदलत्या युगानुसार अद्ययावत करणारे नवे संचालक आपल्या विश्वासपूर्ण सेवेमुळे ग्राहकांचा विश्वास अधिक दृढ करतील असे वक्तव्य रत्नागिरीतील जेष्ठ उद्योजक राजन मलुष्टे यांनी या शुभारंभा प्रसंगी केले.

यावेळी माजी शहर प्रमुख प्रमोद शेरे, तज्ञ सल्लागार श्रीकृष्ण दळी, पतसंस्थेचे प्राधिकृत मंडळाचे प्रमुख हेमंत वणजु, सौरभ मलुष्टे, मिलिंद दळी, ऑडीटर गिरकर, बांधकाम व्यवसायिक वीरेंद्र वणजु, कर सल्लागार अॅड निलेश भिंगार्डे, कायदेविषयक सल्लागार अमेय भिसे, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष गणेश भिंगार्डे, मकरंद खातू, हॉटेल व्यावसायिक गणेश धुरी, अमेय ज्वेलर्सचे अमेय वीरकर, स्वप्नील दळी, ब्रिजेश साळवी, व्यवस्थापक विजय साळुंखे व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

१९८२ साली स्थापन झालेल्या या संस्थेला ३० ऑक्टोबर रोजी ४० वर्षे पूर्ण झाली आहेत. तालूक्याती एक नामवंत संस्था म्हणून राधाकृष्ण पतसंस्थेची ओळख आहे. मागील सहा महिन्यापासून रत्नागिरी खबरदारचे संपादक हेमंत वणजु, उद्योजक सौरभ मलुष्टे, व्यापारी मिलिंद दळी, मकरंद खातू, गणेश भिंगार्डे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचा कारभार सुरु आहे. या कालावधीत संस्थेने कात टाकत अद्ययावत प्रणालीचा अवलंभ केला आहे. कोअर बँकिंग, एटीएम आदी सुविधांनी युक्त करण्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान या शाखेत निर्माण करण्यात आले आहे. शाखेमध्ये आरटीजीएस, एनईएफटी, एसएमएस आदी सुविधांचा शुभारंभ करण्यात आला आहे. यामुळेच ग्राहकांचा ओघ आता या पतसंस्थेकडे वाढत असल्याचे दिसत आहे. सोने तारण, माल तारण, मालमत्ता तारण आदी कर्जे अत्यंत जलद गतीने संस्थेमधून होत आहेत. यामुळेच भविष्यात कोट्यावधींचा व्यवहार करणारी संस्था म्हणून राधाकृष्ण नागरी पतसंस्था आपला नावलौकिक निर्माण करेल असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
06:30 PM 31/Oct/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here