मुंबई : राज्यातील कोरोनाग्रस्तांनी दहा हजारांचा टप्पा पार केला आहे. राज्यात कोरोनाचे नवीन ५८३ रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे आता राज्यातील कोरोना बाधितांची संख्या १०,४९८ वर पोहोचली आहे. गेल्या २४ तासांत १८० कोरोनाबाधित बरे होऊन घरी गेले आहेत. तर २७ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत राज्यात एकूण ४५९ जणांचा मृत्यू झाला तर आतापर्यंत एकूण १७७३ रुग्ण बरे झाले आहेत.
