पंचाहत्तरीतील अशोक सराफ यांची ऊर्जा पाहून थक्क : राज ठाकरे

0

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने दिवाळीच्या निमित्ताने दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे भव्य दिपोत्सवाचे आयोजन केले होते. यावेळी राजकीय नेत्यांसोबत कलाकारांनीदेखील मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली.

यावेळी महाराष्ट्राची हास्यजत्रा मधील कलाकारांनी देखील दिपोत्सवाला उपस्थिती लावली. यावेळी या कलाकारांना राज ठाकरे यांना भेटल्यानंतर आलेला अनुभव फोटो शेअर करत व्यक्त केला. आता, राज ठाकरे यांनी एका कलाकारासोबतचा अनुभव फोटोसहित शेअर केला आहे. ते म्हणजे मराठी मनावर अधिराज्य गाजवणारे अशोक सराफ. राज ठाकरेंनी अशोक सराफ यांचे नाटक पाहून प्रतिक्रियाही दिली.

नुकतंच मी अशोक सराफ आणि निर्मिती सावंत ह्यांचं ‘व्हॅक्युम क्लिनर’ हे नाटक पाहिलं. व्हॅक्युम क्लिनरच्या ‘धक्क्याने’ नात्यांमध्ये निर्माण झालेले ताण दूर होतात हे पाहताना मजा आलीच. पण, वयाची ७५ पूर्ण केलेल्या अशोक सराफ ह्यांची ऊर्जा आणि रंगमंचावरचा वावर पाहून थक्क व्हायला झालं, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. राज यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन पोस्ट शेअर केली आहे. तसेच, निर्मिती सावंत यांचा बहारदार अभिनय आणि संचातील इतर सगळ्याच कलाकारांचा अभिनय मस्त होता. ह्या नाटकाचे लेखक-दिग्दर्शक-कलाकार, तंत्रज्ञ ह्या सगळ्यांचंच मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा देखील, असा मेसेज राज यांनी लिहिला आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:06 PM 01/Nov/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here