नवी दिल्ली : देशभरात १९९३ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने देशभरात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांचा आकडा तब्बल ३५,०४३ वर पोहचला आहे. तर ७३ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात ११४७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत एकूण ८८८९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
