रत्नागिरी : डॉ. निनाद लुब्री यांचे वडिल यशवंत दत्तात्रय लुब्री यांचे बुधवार दि. 29 एप्रिल रात्री प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते 77 वर्षांचे होते. रत्नागिरी येथे पटवर्धन हायस्कूल येथे शिक्षण आणि गव्हरमेंट पाॅलिटेक्निक येथे मेकॅनिकल इंजिनियरींग केल्यानंतर मुंबई येथे महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीत त्यांनी तीस वर्षे काम केले, निवृतीनंतर गेली पंचवीस वर्षे ते रत्नागिरीत वास्तव्यास होते. निवृतीनंतर सामाजिक जाणीव म्हणून त्यांनी अनेकांना व्यवसाय मार्गदर्शनाचे काम केले. बॅडमिंटन, क्रिकेट, कबड्डी या खेळात शालेय जिवनात चमकदार कामगिरी केली होती.
